धाराशिव / प्रतिनिधी-

 सध्या सर्वत्र जात धर्म यावर तिरस्कार पद्धतीने बोलण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र विकासावर किंवा विकासाचे काम कशा पद्धतीने उभा करता येईल यावर सत्ताधारी बोलत नसल्यामुळे अधोगतीचे प्रमाण वाढत चालले असल्याचे थेट टीकास्त्र पारनेर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. निलेश लंके यांनी दि.२६ फेब्रुवारी रोजी नाव न घेता केंद्रातील भाजप सरकार व त्यांच्या परिवारावर सोडले.

कळंब तालुक्यातील संजितपूर येथे जल जीवन पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन आ. लंके यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे मराठवाडा अध्यक्ष प्रा. डॉ. संजय कांबळे, व्यसनमुक्ती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ संदीप तांबारे, युवकचे प्रदेश सरचिटणीस आदित्य गोरे, वक्त विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष तुषार वाघमारे, डॉक्टर विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ अविनाश तांबारे, सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष बालाजी भातलवंडे,

 रणजीत बारकुल, मुसदेख काझी, सुरेश टेकाळे, रमेश देशमुख आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आ लंके म्हणाले की, गरीबी व श्रीमंती मध्ये फार मोठी तफावत वाढत चालली असून ही भयानक दरी आहे. गरीबी पाहायची असेल तर जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रत्येकाने जायला पाहिजे असे आवाहन केले. तसेच राजकीय व्यक्तींना हार, फेटे व शाल घालून सत्कार करण्यापेक्षा तो खर्च जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गरीब कुटुंबांना मदत करावी. त्यामुळे तो केलेला खर्च वाया न जाता त्याची किंमत करता येत नाही तर ती किती तरी पटीने वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. मी माझ्या मतदारसंघात कोरोनापूर्वी चार पटीने अधिक जनतेच्या विकासाची विधायक कामे केली. मात्र कोरोनामध्ये माध्यमाने त्याला प्रसिद्धी देऊन ते तुमच्यासमोर आणली आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपण समाजाप्रती काम केले पाहिजे.  त्यासाठी आपण भान ठेवले पाहिजे असे सांगत समाजात जगत असताना गरिबासांठी काम करताना त्यांच्यामध्ये परमेश्वर पहावा असे आवाहन त्यांनी केले. तसेच लोकांसाठी काम केले तर लोक आपल्याला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. मात्र त्या कामांमध्ये स्वार्थ नसला पाहिजे त्यामुळे प्रत्येकाला संधी येत असते त्या संधीचे सोने करता आले पाहिजे जो समाजासाठी जगला त्याचे सोने होते असे सांगत मी भाषण कमी करतो पण काम जास्ती करतो त्यामुळे माझ्या शब्दात दम असतो असे सांगत संकट समयी धावून गेलेच पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविक व आभार समाधान बाराते यांनी तर सूत्रसंचालन तुषार वाघमारे यांनी मानले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी सरपंच दत्ता काशीद, मृत्युंजय बनसोडे, अमोल सुरवसे, नितीन बिक्कड, मनोज मुदगल, सतीश टेकाळे, दीपक माळी, सुहास काळे, अमोल काळे, बाळासाहेब पानसंबळ, फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष सोनवणे, शिवाजी गोवळकर, दिवटे, महेंद्र शिंदे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक माळी, औदुंबर धोंगडे आदींसह युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top