धाराशिव  प्रतिनिधी-

महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या अधिपत्याखाली लातूर जिल्हा धनुर्विद्या क्रीडा संघटनेच्या वतीने लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलावर आयोजित सब जुनिअर वयोगटातील राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत धाराशिवच्या आर्यन गरडने बुधवारी झालेल्या रिकर्व्ह राउंड प्रकारातून वैयक्तिक एलिमनेशन मध्ये सुवर्ण पदक मिक्स इव्हेंट मध्ये रौप्य पदक पटकावत राज्यात पुन्हा अव्वल स्थान पटकाविले आहे.

आर्यन गरड मागील ५ वर्षांपासून धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटनेकडून खेळत असून या स्पर्धेत तो अमरावती येथील क्रीडा प्रबोधिनीकडून स्पर्धेत सहभागी झाला आहे. आर्यन च्या यशाबद्दल जिल्हा संघटेनचे अध्यक्ष खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे, जिल्हा संघटनेचे सचिव प्रवीण गडदे, सहसचिव अभय वाघोलीकर, खेड ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील गरड, उपसरपंच गणेश गवाड, कोच कैलास लांडगे, एड राम गरड, माजी बाजार समिती अध्यक्ष नितीन गरड, डॉ बाबासाहेब आंबेडकर सह साखर कारखान्याचे माजी संचालक नामदेव गरड आदींसह जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींनी अभिनंदन केले आहे.

 
Top