नळदुर्ग / प्रतिनिधी-
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नळदुर्ग येथील श्री अंबाबाई मंदिरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दीर्घायुष्य लाभावे तसेच त्यांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी आई जगदंबेला साकडे घालुन महाआरती करण्यात आली.
यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके,भाजपाचे शहराध्यक्ष धिमाजी घुगे, मनोज मिश्रा, मल्लिकार्जुन गायकवाड, शिवाजी सुरवसे, सचिन शिंदे, राहुल बोडके, कांबळे विश्वजीत,गजानन हळदे, बालाजी दस, दत्तात्रय जाधव श्रीकांत जगदाळे उपस्थित होते.