तुळजापूर / प्रतिनिधी-

तुळजापुर तालुक्यातील मौजे निलेगाव येथील शेतकरी शरणाप्पा अर्जुन जमादार व त्यांच्या मुलगा गणेश जमादार या दोघांचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू ही घटना सोमवार दि.६ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजण्याच्या निलेगाव येथे घडली. 

 अधिक माहिती अशी की, मौजे निलेगाव येथील शेतकरी शरणाप्पा अर्जुन जमादार (वय ५२ वर्ष) हे शेतातील ज्वारीस पाणी देण्यासाठी मुलगा गणेश जमादार (वय १६ वर्ष) यास सोबत घेऊन निलेगाव शिवारातील गट नंबर ८ मधील शेतातील ज्वारीस पाणी देण्यासाठी गेले व जेव्हा विद्युत मोटार चालु करण्यासाठी बटण दाबण्यासाठी गेले तेव्हा त्यांना विद्युत शॉक लागल्यामुळे शरणाप्पा जमादार यांच्यासह मुलगा गणेश जमादार यास ही विजेचा तीव्र शॉक लागल्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला.

 घटनेची माहिती मिळताच इटकळ औट पोस्ट येथील पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल होवून रीतसर पंचनामा केला व नळदुर्ग पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत शेतकरी शरणाप्पा जमादार यांच्या पश्चात आई ,भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या शेतकरी पिता -पुत्राचा विद्युत शॉक लागून मृत्यू झाल्यामुळे निलेगाव व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 


 
Top