तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील काक्रंबा  येथे एका २३ वर्षिय युवकाचा मोटार सायकला पाठी मागुन ट्रकने जोराची धडक दिल्याने सुमित शेषेराव वाघमारे (२३ )  हा जागीच ठार झाला .  सदरील अपघात तुळजापूर लातुर महामार्ग रस्त्यावर असणाऱ्या काक्रंबा गावानजीक रविवार दि. ५रोजी राञी ८.३०वा. घडला . 

या बाबतीत अधिक माहीती अशी की,  सुमित शेषेराव वागमारे (रा. शिंगोली ता. जि उस्मानाबाद )हा पुण्याला नोकरीला होता . तो गावी आला होता आजोबाला बघण्यासाठी तो भातागळी  ता. लोहारा  येथे आत्याकडे मोटार सायकल (क्र MH-12- SN 0805 ) वरुन जाताना तो काक्रंबा गावानजीक आला असता मागुन आलेल्या ट्रक क्रमांक ने  ( MH26BE9637) मोटार सायकलला धडक दिल्याने  तो ठार झाला. मयत सुमित हा आईवडीलांना ,एकलुता एक मुलगा होता. त्यास दोन बहीण, आई, वडील आहेत. 

 
Top