उस्मानाबाद /प्रतिनिधी-

कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील श्री सिध्दीविनायक ग्रीनटेक इंडस्ट्रीज प्रा लि. या कारखान्याचा सन २०२२-२३ चा चाचणी गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा शुक्रवार, २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ०९ वाजता उत्साहात पार पडला. मशिनरीचे विधिवत पूजन करुन बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले.

  कळंब तालुक्यासह परिसरातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन खामसवाडी शिवारात श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी श्री सिध्दीविनायक ग्रीनटेक इंडस्ट्रीजची मुहुर्तमेढ रोवली. अवघ्या सहा महिन्यात कारखान्याचे काम पूर्ण करुन आज रोजी कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन केले.  सदर कारखान्याची क्षमता १५०० मे.टन असल्याने सदर कारखाना पूर्ण क्षमतेने गाळप करेल असे आश्वासन यावेळी बोलताना दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी दिले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सर्वात मोठी अडचण म्हणजे कारखाने ऊस वेळेत नेत नाहीत व योग्य भाव मिळत नाही, परंतु वरील दोन्ही बाबी सिध्दीविनायक परिवाराने तुळजापूर तालुक्यातील श्री सिध्दीविनायक अॅग्रीटेक या कारखान्याच्या माध्यमातून मोडीत काढल्यामुळे परिसरातील शेतकरी आनंद व्यक्त करत आहेत.

 ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी, वाहतूक ठेकेदार, ऊसतोड कामगारांनी आपलाच कारखाना समजून काम करावे, तसेच आपणा सर्वांच्या विश्वासावर कारखान्यात गाळपासाठी आलेल्या ऊसाला जास्तीत जास्त भाव देणार असल्याचे यावेळी सांगितले

 यावर्षीच्या पहिल्या गळीत हंगामासाठी कारखाना सज्ज झाला असून शुक्रवारी विधिवत पूजन करुन  बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. सदर सोहळ्यास मोहेकर अॅग्रो चे अध्यक्ष हनुमंत मडके, यशदा मल्टीस्टेट चे अध्यक्ष सुधीर सस्ते, तुळजापूर शुगर्स चे अध्यक्ष अॅड.अनिल काळे, खामसवाडी सरपंच अमोल पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष अजित दादा पिंगळे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय पाटील, रामहरी आप्पा शिंदे, दिलीप पाटील, भगवानराव झोरी, प्रा.सुशील शेळके, बार्शी नगर पालिकेचे विरोधी पक्ष नेते अॅड.नागेश अक्कलकोटे, उपसरपंच किरण पाटील, व्यंकटेश कोरे, अ‍ॅड.नितीन भोसले, अॅड.प्रतिक देवळे, हर्षद कुलकर्णी, श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेटचे सीईओ राजेश जाधव, अरविंद गोरे,  यांचेसह ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, वाहतूक ठेकेदार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top