तुळजापूर /प्रतिनिधी-

तुळजापूर येथे जिल्हा परिषद आरोग्य सहाय्यक तानाजी क्षिरसागर यांच्या कन्येच्या लग्नामध्ये  अनोखा उपक्रम राबवून राबवून विविध वृक्षाचे वाटप करण्यात आले. यामध्ये विविध फळाचे विविध फुलांचे झाडे होते

वृक्ष लावून त्याची संगोपन करावे असा सल्ला देखील क्षीरसागर यांनी लग्न समारंभातून दिला  

 वधू-वरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यावरण संदेश देणारा उपक्रम राबवल्याबद्दल सर्व स्तरातून या लग्न समारंभाचे कौतुक केले जात आहे. 

दिनांक 22 फेब्रुवारी रोजी तुळजापूर येथे श्री तानाजी क्षिरसागर यांच्या यांच्या कन्येच्या लग्न समारंभा निमित्त   पुणे आरोग्य सेवेचे उपसंचालक मा. डॉ. राधाकिशन पवार,  लातूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे,  उस्मानाबाद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी अधिकारी डॉ. शिवकुमार हालकुडे,  जिल्हा क्षयरोग अधिकारी  डॉ. रफिक अन्सारी, स्त्री रोग तज्ञ शैलजा ताई मिटकरी, आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शरद मुंडे, बहुजन आरोग्य संघटनेचे अध्यक्ष काकासाहेब वाघमारे, मॅग्मो संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेश गुरव, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र दुरगुडे,  राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या अलकाताई कोरेकर, कुलस्वामिनी सूतगिरणीचे माजी चेअरमन अशोकराव मगर, ज्येष्ठ पत्रकार  राजाभाऊ वैद्य, शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशोक हुंडेकर,  मध्यप्रदेश इंदोर येथील  पियुष घाटोळे,  जयंतराव मराळ, दादासाहेब फत्तेपुरकर ,   सहाय्यक प्रकल्प संचालक  संतोष नलावडे,  डॉ. शकील खान, विजय देशमुख, नगरसेवक अमर मगर,  प्रशांत देशमुख, श्री प्रशांत अपराध, माजी उपप्राचार्य उत्तम हुंडेकर,  अडवोकेट पवन वट्टे,  श्रीमती मनीषाताई सुकाळे,  श्री सतीश बनसोडे, नंदकुमार कदम, डॉ. किसन ऐवळे, डॉ.किसन लोमटे यांच्यासह सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top