कळंब / प्रतिनिधी- 

कृषि उत्पन्न बाजार समिती कार्यक्षेत्रात शेतमालाची खरेदी करण्यासाठी परवाना दिला जातो.  यावर्षी पासून व्यवहार न करणाऱ्या  परवाना धारकांकडून नूतनीकरणासाठी दहा हजार रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामुळे या परवानाधारकातून नाराजी व्यक्त केली जात आहे, पूर्वीप्रमाणे शुल्क आकारण्यात यावे, नसता आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवाजी आप्पा कापसे ( ठाकरे गट ) यांनी दिला आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बाजार समिती ने कसल्याही सुविधा दिलेल्या नाही, येथील व्यापारी असुरक्षित आहे.,रस्ते, नाल्या, स्वच्छता, विद्युत या कडे दुर्लक्ष केले जात आहे.

कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात एकूण एक हजार परवाना धारक आहेत. अनेक जण खरेदी विक्री व्यवहार करतात, त्यामुळे ते परवाना प्रतिवर्षी नूतनीकरण करतात. मात्र दोनशे जवळ पास  आपणास परवाना धारक हे, व्यापार करत नाहीत.पण  प्रतिवर्षी परवाना नूतनीकरण करतात. अशा  परवाना धारकांकडून नूतनीकरणासाठी शुल्क वाढण्यात आले आहे.या पूर्वी फक्त दोनशे तीस रुपये घेतले जात होते.आता दहा हजार रुपये घेतले जात आहेत.या बाबत कुणाबरोबर ही चर्चा करण्यात आलेली नाही.  

प्रतिवर्षी परवाना नूतनीकरण करण्यात येते. यातून समितीला उत्पन्न मिळते. परवानाधारकातून नाराजी व्यक्त केली जात आहे. पणन संचालक यांच्या पत्रानुसार जे परवाना धारक व्यवहार करत नाहीत,  परवाना धारकांना नूतनीकरण फीस दहा हजार रुपये करण्यात आली आहे. 

 परवाना शुल्क रद्द करण्यात यावा , नसता आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवाजी आप्पा कापसे, सतीश टोणगे, प्रशासकांना निवेदन देवून  दिला आहे.

 
Top