उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस अपर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आज अभिवादन करण्यात आले.

 यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार प्रवीण पांडे, नायब तहसीलदार पंकज मंदाडे, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक कुलकर्णी, अव्वल कारकून नरसिंह ढवळे तसेच इतर अधिकारी –कर्मचारी उपस्थित होते.


 
Top