उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले असले तरीही, हैदराबाद स्टेट व त्यातील मराठवाड्याचा संपूर्ण भूभाग व जनता निजामाच्या , रजाकाराच्या पारतंत्र्यखाली होती.  तेंव्हा स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, नरेंद्र आर्य, विजेंद्र काबरा, दगडाबाई शेळके अशा अनेक क्रांतिकारकांनी त्या अन्यायकारी निजामशाही पासून मुक्ती मिळवून स्वतंत्र होण्यासाठी प्रचंड मोठा स्वातंत्र्यलढा उभारला होता ज्याला आपण मराठवाडा मुक्तीसंग्राम म्हणून ओळखतो. मुक्तीसंग्राम क्रांतिकारकांना तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस कारवाईचे बळ दिले व १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैद्राबाद व पर्यायाने मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. भारताच्या इतिहासातील हा  सर्वात मोठा स्वातंत्र्यलढा असतानाही याला अद्याप पर्यंत इतिहासात स्थान मिळाले नाही. हळूहळू हा लढा विस्मृतीत जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नवीन पिढी यापासून अनभिज्ञ आहे. या मुक्तीसंग्रामा  संदर्भातील माहिती नवीन पिढीला दिसून येत नाही. त्यामुळे मराठवाड्याच्या मुक्तिसंग्रामाचा व यासाठी क्रांतिकारकांनी दिलेल्या स्वातंत्र्यलढ्यातील अभूतपूर्व योगदानाचा इतिहास शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करावा, जेणेकरून नवीन पिढीला या इतिहासासंदर्भात ज्ञान प्राप्त होऊ शकेल. या करिता मराठवाडा मुक्ती संग्रामच्या अमृत महोत्सवी वर्ष निमित्ताने  हा विषय अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट करावा अशी मागणी माननीय मुख्यमंत्री व माननीय उपमुख्यमंत्री यांच्याकडे जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांच्या मार्फत मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव समिती, जिल्हा धाराशिव चे संयोजक युवराज  नळे यांनी केले आहे. 

 या प्रसंगी अभय इंगळे, राजसिंह राजेनिंबाळकर, राहुल काकडे, संदिप भैय्या कोकाटे, ॲड कुलदिपसिंह भोसले, प्रविण जगताप, रविंद्र शिंदे, शेषेराव उंबरे, अमोल राजेनिंबाळकर, सुजित साळुंके, संदिप इंगळे, दाजिआप्पा पवार, विनोद निंबाळकर, अमित कदम, जितेंद्र नाईकवाडी,उदय देशमुख, सागर दंडनाईक, ओंकार देशमुख इत्यादींची उपस्थिती होती.


 
Top