तुळजापूर / प्रतिनिधी- 

  आपण भक्ती भावात दैवी शक्ती पाहु शकतो , असे स्पष्ट करुन  महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी आद्यगुरु असुन श्रीतुळजाभवानी व राज माता माँ जिजाऊ या  छञपती शिवाजी महाराज यांच्या गुरु आहेत.  आता  नैसर्गिक शेती कडे वळणे गरजेचे असुन  तणाव दूर करण्यासाठी  दररोज योगसाधना करा,असे प्रतिपादन अध्यात्मिक संत गुरुदेव श्री श्री रविशंकर देवीचरणी  यांनी  शक्तीपीठ  तिर्थक्षेञ तुळजापूरात    भक्तीकी  लहर अंतर्गत  आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने  सैनिक शाळेच्या मैदानावर आयोजित  जागर भक्ती या महासत्संग  या कार्यक्रमात केले. 

 कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तुळजापूर पुण्यनगरीत परम पूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर  यांच्या उपस्थितीत जागर भक्तीचा  हा महासत्संगाचा बोलताना गुरुदेव पुढे म्हणाले की, कुंभ मेळावा बारा वर्षानंतर येतो तसे बारावर्षानंतर येथे आलो असुन माझा दृष्टीने हा कुंभमेळाच असल्याचे यावेळी म्हणाले 

 छञपती शिवाजीमहाराज रामदास भेटी बाबतीत महासत्संगात बोलताना म्हणाले संत रामदास छञपती शिवाजी महाराज या भेट गोष्टीतत आपण पडू नये कारण इतिहास खरा की खोटा हे ठरवणे आपल्याला अशक्य असल्याचे सांगुन संभाजी ब्रिगेड के बच्चे अछे है ,असे सांगुन संभाजी ब्रिगेड बाबतीत निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकला .  नैसर्गिक शेती काळाची गरज असुन हे करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर  चारपट उत्पन्न निघेल,असे यावेळी म्हणाले  नोकरीतील तणाव दूर करण्यासाठी रोज १० ते २० मिनीटे योग ध्यान करा समस्या कायम राहत नसतात हे लक्षात ठेवा 


 संभाजी ब्रिगेड कार्यकत्यांनी घेतले ताब्यात 

   संभाजी ब्रिगेडच्या कार्यकत्यांनी जयभवानी जय शिवाजी  सह  . श्री श्री रविशंकर यांच्याविरोधात घोषणाबाजी करत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काही काळ गोंधळ केला माञ तात्काळ  पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले नंतर श्री श्री रविशंकर यांचा जागर भक्तीचा कार्यक्रम  सुरुळीत पार पडला.


जिल्हा पोलिसांच्या मध्यस्थीने समेट 

 आर्ट ऑफ लिविंगचे संस्थापक श्रीश्री रविशंकर यांच्या तुळजापूर येथील कार्यक्रमाच्या अनुषंगाने संभाजी ब्रिगेडने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. श्रीश्री रविशंकर यांच्या वेबसाईटवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी असलेल्या विधानावर आक्षेप संभाजी ब्रिगेड या संघटनेने ही भूमिका घेतली होती. गुरुवारी तुळजापूर येथे आर्ट ऑफ लिविंगच्या कार्यक्रमासाठी श्रीश्री रविशंकर हे आले असता जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलाच्या गोपनीय शाखेने संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या पदाधिकारी आणि श्रीश्री रविशंकर यांची भेट घडवून आणली. श्रीश्री रविशंकर यांनी संभाजी ब्रिगेडने केलेल्या मागणीनुसार त्यांच्या वेबसाईटवरील ते विधान हटविण्याचे मान्य केले. आर्ट ऑफ लिविंग आणि संभाजी ब्रिगेड यांच्यामध्ये जिल्हा पोलीस दलाने मध्यस्थी करीत समेट घडवून आणल्यामुळे हा श्रीश्री रविशंकर यांचा तुळजापूर येथील कार्यक्रम शांततेत पार पडला.


 
Top