धाराशिव / प्रतिनिधी-

 खरंतर भारतात सुमारे 70 टक्के लोक हे ग्रामीण भागाशी जोडलेले असल्यामुळे व त्यांना देशाच्या मुख्य आर्थिक प्रवाहात सामील करणे आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून ग्रामीण भागात गेली पंधरा वर्षे अविरत सेवा देण्याचे काम लोकमंगल मल्टीस्टेट च्या माध्यमातून सुरू आहे.

   ग्रामीण भागातील लोकांना आपल्या आर्थिक व्यवहार सुखकर करण्यासाठी ही मल्टीस्टेट मदत करेलच व युवा उद्योजकांना आर्थिक मदत करण्यासाठी नेहमी अग्रेसर असेल. मल्टीस्टेटच्या 28 शाखा या नव्याने सुशोभीकरण करण्यात आलेल्या आहेत. सर्व शाखांना नवीन फर्निचर, काऊंटर, नवीन संगणक, ग्राहकांना सुसज्ज अशी आसन व्यवस्था, असे नवे रूप शाखांना देण्यात आले आहे. सर्व शाखांमध्ये नवीन संस्थेची स्कीम व मार्केटिंगचे बॅनर देखील मोठ्या प्रमाणावर लावण्यात आलेले आहेत.

   वरील सर्व शाखांचे उद्घाटन  मल्टीस्टेटचे चेअरमन पंडित लोमटे, संचालक बालाजी शिंदे,शिवाजी   पाटील, सचिन आडगळे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत अंबुरे व सर्व शाखांचे स्थानिक सल्लागार, खातेदार,कर्मचारी उपस्थित होते.

 
Top