परंडा / प्रतिनिधी-

मराठी भाषेला अभिजात भाषेच्या संदर्भात सर्व निकष  पूर्ण करूनही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आज तागायत मिळालेला नाही ही मराठी भाषिकांची खंत प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी  शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयात आयोजित केलेल्या मराठी राजभाषा दिनानिमित्त अध्यक्षीय समारोप करताना व्यक्त केली.     

या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख डॉ प्रशांत गायकवाड हे उपस्थित होते. त्यांनी सर्व उपस्थित महाविद्यालयातील उपस्थित प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांना राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देऊन मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यायचा असेल तर राजकीय इच्छाशक्तीची गरज असल्याचे प्रतिपादन व्यक्त केले. इतर अभिजात दर्जा मिळालेल्या भाषेच्या तुलनेत मराठी भाषा अति प्राचीन असतानाही त्या भाषेला आजतागायत अभिजात दर्जा मिळालेला नाही ही खंत त्यांनी व्यक्त केली .मराठी भाषेचे संवर्धन व संरक्षण करायचे असेल तर मराठी भाषेच्या शिक्षणावर भर दिला पाहिजे .यावेळी व्यासपीठावर आय क्यू ए सी चेअरमन प्रा डॉ महेशकुमार माने, मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ एच एम गायकवाड, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे, वाणिज्य विभागाचे प्रा डॉ संतोष काळे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी वरिष्ठ विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्राध्यापक डॉ अक्षय घुमरे, प्रा अमर गोरेपाटील, प्रा डॉ विद्याधर नलवडे, प्रा जगन्नाथ माळी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन मराठी विभागाच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले तर आभार मराठी भाग प्रमुख डॉ हरिश्चंद्र गायकवाड यांनी मानले.     कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी भागवत दडमल, जयवंत देशमुख, रामराजे जाधव व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

 
Top