जळकोट  प्रतिनिधी 

 जळकोट ता. तुळजापूर येथील रहिवाशी असलेले व जवाहर महाविद्यालय अणदूर येथे प्राध्यापक म्हणून सेवेत असलेले विरभद्रेश्वर सामलिंग स्वामी यांनी "ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणांमध्ये महिला बचत गटाचे योगदान: एक समाजशास्त्रीय अभ्यास" (विशेष संदर्भ- उस्मानाबाद जिल्हा) या विषयावर त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्याकडे  संशोधन प्रबंध सादर केला होता. त्याचे परीक्षण होऊन दिनांक 21फेब्रुवारी 2023 रोजी विद्यापीठाकडून समाजशास्त्र विषयात केलेल्या संशोधनाबद्दल  "विद्यावाचस्पती" म्हणजेच  ( पी.एच.डी. ) पदवी प्रदान करण्यात आली. त्यांना डॉक्टर चंद्रशेखर पाटील पंडित दीनदयाल उपाध्याय  महाविद्यालय, देवणी जि. लातूर यांचे मार्गदर्शन लाभले.  या यशाबद्दल जवाहर महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष तथा अणदूरचे सरपंच रामचंद्र आलुरे, ॲड. लक्ष्मीकांत पाटील, प्रा. भालचंद्र बिराजदार, प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी व महाविद्यालयातील सहकारी  प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाल, पुष्पहार, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन. यथोचित सत्कार करून अभिनंदन केले. तर जळकोट येथील जिल्हा परिषद प्रशाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष माळगे यांनीही अभिनंदन करून भावी करिअरसाठी शुभेच्छा दिल्या.

 
Top