उस्मानाबाद / प्रतिनिधी-
अटल भूजल योजना ही अत्यंत महत्वकांक्षी योजना असून लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. पाण्याचा अपयव टाळावा याकरीता सर्वांनी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे.  पाण्याचा ताळेबंद करुन जलसुरक्षा आराखडा सक्षमपणे राबविण्यात यावा, असे आवाहन  अटल भूजल योजना व भूजल सर्वेक्षेण  एंव विकास यंत्रणा महाराष्ट्र राज्य पुणेचे आयुक्त तथा प्रकल्प संचालक चिंतामणी जोशी यांनी केले. 
अटल भूजल पंधरवडा निमित्त वसंतराव नाईक कृषी महाविदयालय येथे सरपंच, ग्रामसेवक, भूजल मित्र यांचा जिल्हास्तरीय मेळावा
अटल भूजल योजनेतंर्गत अटल भूजल पंधरवडा दिनांक 13 ते 27 फेब्रुवारी 2023 दरम्यान साजरा करण्यात येत आहे याच अनुषंगाने कृषी तंत्र विदयालय येडशी ता.जि.उस्मानाबाद येथे शालेय स्पर्धेमध्ये सहभागी विदयार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले तसेच रिचार्ज शाफ्ट चे उद्घाटन यावेळी  चिंतामणी जोशी आयुक्त तथा प्रकल्प संचालक, अटल भूजल योजना, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या हस्ते करण्यात आले.  तर आळणी येथील भूजल माहिती, शिक्षण व संवाद प्रसारण केंद्राचे उद्घाटन व बचत गटातील महिला यांना देशी वाणाच्या भाजीपाला बी – बियाणाचे वाटप यावेळी करण्यात आले. व वसंतराव नाईक कृषी महाविदयालय येथे सरपंच, ग्रामसेवक, भूजल मित्र यांना अटल भूजल योजनेविषयी मार्गदर्शन करण्यात आले 
   नितीन पवार क्षेत्र सहायक, रेशीम विभाग ,   आर . एस .  मंटूरे  व .क्षे.  सहायक, आडसूळ  जी. एस. जलसंधारण अधिकारी ल. पा.  जि.प.  पि. के. महामुनी  जलसंधारण अधिकारी, मृदू व जलसंधारण विभाग,  डॉ. वैभव पाटील  पशुधन अधिकारी,  आर.डी.गायकवाड तंत्र अधिकारी जिल्हाअधीक्षक कृषी अधीक्षक कार्यालय,  आर.आर.चोबे  उपसंचालक सामाजिक वनीकरण, बी.वि.ढवळे  उप कार्यकारी अभियंता , ग्रामीण  पाणी पुरवठा  विभाग, जि. प. उस्मानाबाद यांची बैठक घेण्यात आली. तसेच जिल्हा प्रयोग शाळा उस्मानाबाद येथे पाहणी केली व मार्गदर्शन केले व कार्यालय इमारत जागा पाहणी केली तसेच बोरी ता.तुळजापूर जि. उस्मानाबाद येथे जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा उदभव बळकटीकरण रिचार्ज शाफट कामाचा शुभारंभ करण्यात आला. 
यावेळी   बी.एस.मेश्राम, प्रादेशिक उपसंचालक, भू.स.वि.यं. औरंगाबाद, डॉ.के.आर.कांबळे, प्राचार्य, वसंतराव नाईक कृषी महाविदयालय किणी ता.उस्मानाबाद,  एस.बी.गायकवाड, वरिष्ठ भूवैज्ञानिक,  डॉ.मेघा शिंदे, सहाय्यक भूवैज्ञानिक, भू.स.वि.यं. उस्मानाबाद, डॉ. सोनिया पवार, सरपंच, ग्रामपंचायत येडशी प्रमोद वीर, सरपंच, संजीवनी पौळ, ग्रा.सदस्य श्यामसुंदर लावंड,  कृष्णा कदम,  टेकाळे, ग्रामपंचायत आळणी,  सौ.प्रियाताई सस्ते, उपसरपंच ग्रामपंचायत येडशी,  विश्वनाथ खोत, भूजल मित्र, अटल भूजल योजना, श्रीकांत हावळे, सरपंच ग्रामपंचायत बोरी ता.तुळजापूर,  मनिषा डोंगरे, सहा.भूवैज्ञानिक,  शुभांगी गुरवे, कनिष्ठ भूवैज्ञानिक, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्ष व जिल्हा अंमलबजावणी भागीदार संस्था, उस्मानाबाद कॅप्म  वैशाली घुगे आदी उपस्थित होते.

 
Top