तुळजापूर / प्रतिनिधी-

 कै. उमराव नारायण फत्तेपूरे यांच्या स्मरणार्थ  युवा नेते  गणेश शिवाजी फत्तेपूरे यांच्या वतीने जिल्हा  परिषद प्राथमिक शाळा भातागळी  येथील   विद्यार्थ्यांना शैक्षणिक  साहित्य वाटप करण्यात आले.

 जिल्हा परिषद  प्राथमिक शाळेतील २० गरजू   विद्यार्थांना वह्या,पुस्तक, पेन  आदी शालेय साहित्य  वाटप करण्यात आले.यावेळी  शालेय  समितीचे अध्यक्ष निळकंठ  वाघमारे, मुख्याध्यापक व्यकंटराव जगताप ,वैरागकर सर,  दाभाडे सर ,काळे सर  सह दत्ता जगताप ,वैभव जगताप ,रवी जगताप  ,कोंडिबा जगताप सह शिक्षक कर्मचारी विद्यार्थी  उपस्थित होते .


 
Top