उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत बाल आनंद मेळावा (खरी कमाई) उपक्रम आज दिनांक 04 फेब्रुवारी 2023 शनिवार रोजी घेण्यात आला. सकाळी ठीक 09:00 वाजता जुनेद ( बबलू) मोमिन यांच्या हस्ते फीत कापून विद्यार्थ्यांनी थाटलेल्या बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. 

यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेख मोहियोद्दीन , उपाध्यक्ष काझी मुख्तार अहेमद , सदस्य शेख मुजीब , मुलानी इर्शाद, व सर्व सदस्य गण उपस्थित होते. यावेळी पाक-कला प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांच्या निरिक्षणासाठी निरिक्षक म्हणून सय्यद शबनम मॅडम गुलशन ए अत्फाल उर्दू शाळा उस्मानाबाद , पटेल अजहर सर जि. प. प्रशाला बेंबळी , इनामदार मुफस्सिल सर पंडित जवाहरलाल नेहरू हायस्कूल भूम , श्रीमती शाफिया मॅडम जि. प. उर्दू शाळा अंबेहोळ हे पाहुणे उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात उद्घाटन समारंभ संपन्न झाला 

 यानंतर सर्व गावकऱ्यांसाठी बाजार खुला करण्यात आला. मान्यवरांच्या स्वागतानंतर त्यांनीही बाजारातील पकवान्नांचा आस्वाद घेत विद्यार्थ्यांच्या पाककृतींचे भरभरून कौतुक केले.या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक शहा तय्यबअली आणि सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.शेवटी सर्व उपस्थितांचे आभार प्रदर्शन करून मेळाव्याची सांगता झाली.


 
Top