कळंब / प्रतिनिधी-

केलेल्या सामाजिक कार्याची पत्रकार हे प्रसिद्धी देत असतात, यामुळे खऱ्या सामाजिक काम करणाऱ्यांची दखल समाजाकडून घेतली जात असते. अमर उर्फ बाबू चाऊस यांनी सामाजिक कामाचा वसा घेऊन जे काम केले आहे त्याची पत्रकारांनी प्रसिद्धी तर दिलीच त्याचबरोबर कामाची योग्य दखल घेऊन त्यांना शिवभूषण हा पुरस्कार दिला आहे ही कौतुकाची थाप पत्रकाराकडून मिळाली आहे ही खरी सामाजिक कार्याची पावती आहे. पुरस्कार हा तरुणांना सामाजिक कामाची प्रेरणा देणारा ठरेल असे विचार शिवव्याख्याते प्रा विशाल गरड यांनी पत्रकार भवन कळंब  तालुका पत्रकार संघ आयोजित पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना व्यक्त केले.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हा अध्यक्ष महादेव महाराज अडसूळ हे होते .तर याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी आप्पा कापसे (तालुकाध्यक्ष शिवसेना) ,अजित पिंगळे (तालुकाध्यक्ष भाजपा,) अशोक शिंदे (अध्यक्ष कळंब तालुका पत्रकार संघ), बालाजी निरफळ (उपाध्यक्ष  जिल्हा पत्रकार संघ) यांची उपस्थिती होती.

 कार्यक्रमाच्या सुरुवातीला दर्पणकार आचार्य बाळकृष्ण जांभेकर व कळंब तालुका पत्रकार संघाचे संस्थापक शिवशंकर बाप्पा घोंगडे यांच्या प्रतिमांचे पूजन करून प्रमुख पाहुणे यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर कळंब तालुका पत्रकार संघाचा " शिवभूषण पुरस्कार "शाल , ,वृक्षाचे रोपटे,मानपत्र   देऊन   सामाजिक कार्यकर्ते अमर उर्फ बाबू चाऊस यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रास्ताविक अशोक शिंदे यांनी केले.

  याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना अमर उर्फ बाबू चाऊस यास गहिवरून आले .आपली आई आजारपणात मृत्यूशी झुंज देत असताना तिला भेटू शकलो , हि खंत त्यांनी बोलून दाखवली .हा पुरस्कार  माझी आई व मित्रांना समर्पित केला आहे.   याप्रसंगी शिवाजी आप्पा कापसे यांनी पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड केली याबद्दल आनंद व्यक्त करून आज काही संस्था कडून पुरस्कारांचा बाजार मांडला जात आहे .पुरस्कार विकत घेतले  जात असून, बाजार मांडला आहे.याबद्दल खंत व्यक्त केली. तर अजित पिंगळे यांनी आपल्या भाषणात अमर चाऊस यांचे कार्य आपण जवळून बघितले आहे त्यांनी कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम केले त्याचबरोबर शिवनेरी किल्ल्यावरून कळंब शहरात शिवजन्मोत्सवासाठी शिवज्योत आणण्याचं  कार्य केला आहे .

    कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेव महाराज अडसूळ यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपाच्या भाषणात पुरस्कारामुळे सामाजिक कार्यकर्त्याचे मनोबल वाढते. असे सांगून पत्रकार संघाने सामाजिक कामाची व योग्य व्यक्तीची निवड केली असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी केले .सूत्रसंचालन  प्राचार्य जगदीश गवळी यांनी तर आभार रमेश आंबीरकर यांनी मानले कार्यक्रमास राजकीय सामाजिक क्षेत्रातील तसेच पत्रकार उपस्थित होते.

 
Top