परंडा  / प्रतिनिधी-

  रविवार दिनांक 26 फेब्रुवारी  कल्याणसागर समूहातील कल्याणसागर माध्यमिक विद्यालय परंडाच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन व शुभेच्छापर निरोप समारंभ आनंदी वातावरणामध्ये संपन्न झाला 

.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. आमदार श्री. सुजितसिंह ठाकूर  प्रमुख पाहुणे म्हणून कल्याणसागर समूहातील माजी विद्यार्थी डेप्युटी कलेक्टर  अजिंक्य गोडगे तसेच एच.डी.एफ.सी बँक शाखा पुणे चे डेप्युटी मॅनेजर  रोहित वेताळ हे उपस्थित होते ,कल्याणसागर समूहाचे मार्गदर्शक  विकास कुलकर्णी, संस्थेच्या सचिवा  प्रज्ञाताई कुलकर्णी संस्थेचे उपाध्यक्ष अजित पाटील कल्याणसागर बँकेचे  व्हा. चेअरमन  राजाभाऊ चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते शिवाजी महाराजांच्या व सरस्वती प्रतिमांचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.विद्यालयाच्या वतीने उपस्थितांचा यथोचित सत्कार करण्यात आला. 

अध्यक्षीय भाषणामध्ये आमदार  सुजितसिंह  ठाकूर   यांनी सांगितले की, कल्याणसागर समूहातील कोणतेही युनिट हे गुणवत्ता पूर्ण शिक्षणाबरोबरच संस्कारक्षम शिक्षण देण्यावरती अधिकाधिक भर देऊन उत्तम पद्धतीचे नागरिक घडवल्याचं उदाहरण म्हणजे हे आज उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे हे होय असे सांगितले. कोणतीही गोष्ट नियोजनपूर्वक केल्यास आपण यशापर्यंत नक्की जाऊ शकतो एवढेच नव्हे तर यश आपल्या पायाशी लोळण घातल्याशिवाय राहत नाही असेही विचार यावेळी त्यांनी व्यक्त केले .प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे डेप्युटी कलेक्टर  अजिंक्य गोडगे यांनी आपल्या प्राथमिक शिक्षणापासून ते अधिकारी होण्याच्या प्रवासाचा रोमहर्षक प्रवास विद्यार्थ्यांना कथन करीत कोणतीच गोष्ट अशक्य नसते फक्त आपल्याकडं उदात्त ध्येय,यशस्वी प्रयत्न  आणि  कामातील सातत्य आईवडिलांचे सहकार्य असणे गरजेचे आहे असेही विचार व्यक्त केले.  रोहित वेताळ यांनी यावेळी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की,  जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर नियोजन सातत्य चिकाटी आणि कोणतेही कष्ट करण्याची मानसिक तयारी असल्यास यश निश्चित मिळते हे आपल्या स्व अनुभवातून सांगितले. कल्याण सागर समूहाचे मार्गदर्शक श्री.विकास कुलकर्णी यांनीही विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन करून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना  परीक्षा सुखकारक जावो अशा पद्धतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या प्रमाणात पालक  ही उपस्थित होते.  स्वंयशासन दिनाचे पदाधिकारी  मुख्याध्यापक आबेद पठाण, शिक्षणाधिकारी प्राथमिक कुमारी सेजल ठाकूर ,शिक्षणाधिकारी माध्यमिक कुमार रितेश पवार, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक कुमार आसद जमादार ,गटशिक्षणाधिकारी कुमारी गौरवी भालेराव, विस्तार अधिकारी सृष्टी पाटील, ऋतुजा गवारे, उपमुख्याध्यापक कुमारी नेहा पठाण, कुमार श्वेता घोगरे ,कुमारी सपना मोहोळकर ,पर्यवेक्षक कुमारी प्रणाली वळसंगकर कुमारी कश्यप सय्यद, कुमारी प्रेरणा औसरे कुमारी नंदिनी बारसकर ,लिपिक कुमारी तेजस्विनी बोडके, राजनंदिनी आलबत्ते ,आक्सा हन्नुरे

व कुमारी अंजुम पठाण ,शिक्षक प्रतिनिधी म्हणून सौरभ वाघमारे ,कृष्णा पवार ,प्रथम आगरकर, सुयशसिंह सद्दीवाल, पृथ्वीराज फंड ,जुनेद पठाण, प्रज्वल मोरे तर शिक्षिका प्रतिनिधी कुमारी वैष्णवी ऐतवाडे ,रिया शिंदे,कुमारी गौरी काळे, समीक्षा पाटील , सृष्टी गोफणे  हे होते. या दिनाच्या शिक्षक विद्यार्थ्यांनी  वर्गनिहाय वेगवेगळ्या विषयावर अध्यापन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण गरड  यांनी केले व आभार प्रदर्शन श्री गव्हाणे अजित यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री मुकुंद भोसले,श्री चंद्रकांत तनपुरे,श्री महादेव नरुटे, श्री सतीश चौधरी,श्री सागर काळे,सौ. राणी चव्हाण, सौ. अर्चना यादव यांनी परिश्रम घेतले.

 
Top