तुळजापूर/ प्रतिनिधी-

 श्री तुळजाभवानी मातेच्या शांकंभरी नवराञोत्सवातील सातव्या माळेदिनी गुरुवार दि.५ रोजी  2 हैदराबाद येथील भाविकांने  तीन तोळ्याची सोन्याची नाथ व दोन पाटल्या अर्पण केल्या आहेत.   मंदिर संस्थानच्या वतीने सदर भाविकांचा कुटुंबीयांसह सत्कार करण्यात आला आहे. हैदराबाद येथील नरेंद्र रेड्ड्या चेर्ला  या भाविकाने गुरुवारी (दि. 05 जानेवारी) तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.

 यावेळी नरेंद्र रेड्ड्या चेर्ला तुळजाभवानी चरणी 38.420 ग्रॅम वजनाची सोन्याचा नथ व दोन पाटल्या अर्पण केल्या. या निमित्त नरेंद्र रेड्ड्या  कुटुंबीयांचा मंदिर संस्थानच्या वतीने मंदिर संस्थानचे सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक  विश्वास कदम यांनी तुळजाभवानी मातेची प्रतिमा, प्रसाद व श्रीफळ देऊन सत्कार केला.


 
Top