उस्मानाबाद/प्रतिनिधी -

व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे,जिल्हा कार्याध्यक्ष रहीम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत उस्मानाबाद तालुका अध्यक्ष पदी अमजद सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली असून सदरील नियुक्ती पत्र जेष्ठ पत्रकार मार्गदर्शक राजाभाऊ वैद्य यांच्या हस्ते देण्यात आले, 

  व्हाईस ऑफ मिडिया ही राष्ट्रीय पातळीवर काम करणारी पत्रकार संघटना असून या पत्रकार संघटनेची उस्मानाबाद जिल्ह्यातील उर्वरित कार्यकारणी  जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे जिल्हा कार्याध्यक्ष रहीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच घोषित करण्यात येणार असून  उस्मानाबाद तालुक्यात अमजद सय्यद  यांची तालुका अध्यक्ष  म्हणून निवड जाहीर झालेली आहे.

 लवकरच उस्मानाबाद तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची उर्वरित कार्यकारिणी  घोषित करण्यात येणार आहे.

 देशातील 20 प्रमुख संपादकांनी एकत्रित येत या राष्ट्रीय संघटनेची स्थापना केली आहे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय आवटे राज्य अध्यक्ष राजा माने हे आहेत पत्रकारांची आरोग्य, पत्रकारांच्या मुलांचे शिक्षण, पत्रकारांच्या सेवानिवृत्तीचे प्रश्न, पत्रकाराचे घर, पत्रकारांना नव्या तंत्रज्ञानाला जुळवून घेण्यासाठी लागणारे प्रशिक्षण आदीवर ही संघटना प्रामुख्याने काम करणार आहे देशातील 22 राज्यात या संघटनेचा विस्तार झालेला असून जवळपास 18 हजार पत्रकार या संघटनेची जोडले गेले आहेत तालुक्याच्या ग्रामीण भागापर्यंत या संघटनेचा विस्तार करण्यात येत असून अमजद सय्यद यांच्या  निवडीबद्दल उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व स्तरातून  अभिनंदन केले जात आहे.

यावेळी सतीश मातने सर, सुधीर पवार, पांडुरंग मते,आकाश नरोटे, गंगावणे,अजित माळी, ओंकार कुलकर्णी, सलीम पठाण, जफर शेख,कुंदन शिंदे,सागर यांच्यासह व्हॉईस ऑफ इंडिया पत्रकार संघाचे पदाधिकारी, जेष्ठ पत्रकार मार्गदर्शक आदी उपस्थित होते.

 
Top