तुळजापूर/ प्रतिनिधी-

 तालुक्यातील कसई येथे एका महिलेचा विवस्ञ अवस्थेत मृतदेह गुरुवार दि.५रोजी शेतात आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदरील महिला ही कसई येथील असल्याचे समजते.

या बाबतीत अधिक माहीती अशी की, कसई येथील दत्ता रोकडे यांच्या शेतात  विवस्ञ अवस्थेत एक मृतदेह आढळला याची माहीती ग्रामस्थांनी पोलिसांना देताच पोलिस घटना स्थळी दाखल झाले. सदरील  महिलेचे नाव अविंदा कांबळे वय ३५ आहे.सदरील महिलेचा गळा आवळुन खुन केल्याची चर्चा आहे. सदरील खुन कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाला नाही तपासाअंती खुनाचे कारण स्पष्ट होणार आहे. 

 
Top