तुळजापूर / प्रतिनिधी-
संभाजीनगर विभाग शिक्षक मतदार संघाचे भाजपा महायुती व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार प्रा. किरण पाटील यांनी शनिवार दि. १४रोजी तिर्थक्षेञ तुळजापूरात येवुन प्रसिद्धी माध्यमातून दूर ठेवुन तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्याने आचार संहितेचेभाजपा ने धसका घेतल्याची चर्चा राजकिय वर्तुळात चर्चिली जात होती.
भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चिञाताई वाघ यांनी मंदीरात पञकार परिषद घेवुन आचार संहिता भंगाची तक्रार महाविकासआघाडी ने केल्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर (औरंगाबाद) विभाग शिक्षक मतदार संघाचे भाजपा महायुती व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार प्रा. किरण पाटील यांनी शनिवार दि. १४रोजी प्रसिद्धी माध्यमातून दूर ठेवुन तुळजाभवानीचे दर्शन घेतले.
यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील, प्रविण धुगे, नितीन काळे, नारायण नन्नवरे, राजेसिंह निंबाळकर, संतोष बोबडे , शांताराम पेंदे सह भाजपा पदाधिकारी, कार्यकते उपस्थितीत होते.