तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील सांगवीमार्डी येथील ६५ वर्षिय वृध्दाने सततच्या आजारास कंटाळून बोरीचा झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना  शनिवारी दि.१४ रोजी सकाळी अकरा वाजता उघडकिस आली.

 या बाबतीत अधिक माहीतीअशी की,  तुळजापूर  तालुक्यातील सांगवीमार्डी येथील देवीदास कालीदास सुरते ( 65 ) रा. सांगवी मार्डी ता. तुळजापूर यांनी त्याच्या सततच्यास आजारास कंटाळुन सांगवी- मार्डी ते काटी जाणाऱ्या रोडच्या कडेला असलेल्या विनायक हंगरगेकर यांच्या शेतातील  बांधावर असलेल्या बोरीच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 

या प्रकरणी अनिकेत सोनवणे यांनी दिलेल्या फिर्याद वरुन तुळजापूर पोलिस ठाण्यात गुरंन ४/२३कलम १७४ सीआरपीसी अन्वय गुन्हा  नोंद करण्यात आला असुन याचा पुढील तपास पोलिस करीत आहेत. 


 
Top