तुळजापूर / प्रतिनिधी-

श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील टीपीओ अंतर्गत पुणे येथील टीसीएस या कंपनीत संगणक शाखेतील कौस्तुभ चंदूलाल चव्हाण याची ट्रेनी असिस्टंट सिस्टीम इंजिनियर या पदी निवड झाली आहे. यासाठी कंपनीच्या वतीने ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून  विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा घेऊन मुलाखतीतुन निवड करण्यात आली.

 व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोल्हे ,प्राचार्य प्रा.रवी मुदकना ,विभाग प्रमुख प्रा.रवींद्र आडेकर ,टीपीओ प्रमुख प्रा.प्रदीप हंगरगेकर , प्रा.छाया घाडगे यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.


 
Top