परंडा /प्रतिनिधी: - 

वंचित बहुजन आघाडी व शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे )यांच्या युतीची घोषणा आंबेडकर भवन नायगाव मुंबई येथून प्रकाश आंबेडकर व उद्धव ठाकरे या प्रमुख नेत्यांनी युतीची घोषणा केल्यानंतर आज परंडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये वंचित बहुजन आघाडी व शिवसेने चे नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांनी एकत्र येत या नव्या युतीचे फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे भरून जोरदार स्वागत करत आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी दोन्ही पक्षाचे प्रमुखपदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवशक्ती-भिमशक्तीचा विजय असो बाळासाहेब आंबेडकर आगे बढो उद्धव ठाकरे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है या घोषणा कार्यकर्ते देत होते.यावेळी शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला.   यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख मेघराज पाटिल, शिवसेनेचे शहराध्यक्ष नगरसेवक इरफान शेख, मा.नगरसेवक मैनुदिन तुटके ,फुले आंबेडकर विद्वत सभा राज्य समन्वयक व वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते डॉ.शहाजी चंदनशिवे सर ,वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के ,जिल्हा सहसचिव मोहन बनसोडे ,तालुका अध्यक्ष कृष्णा जाधव ,शहराध्यक्ष किरण बनसोडे ,डॉ आनंद देडगे ,तालुका महासचिव राहुल पवार ,विलास जाधव ,तालुका उपाध्यक्ष मधुकर सुरवसे ,दिगंबर गुडे ,अंकुश दाभाडे ,युवा नेते गणेश सरवदे ,सागर बनसोडे ,फिरोज तांबोळी ,गणेश शिंदे ,प्रदिप परीहार ,आप्पा गायकवाड ,सुहास पाटिल ,लक्ष्मण चव्हाण ,अमोल चव्हाण सुनील दनाने ,स्वप्निल कसबे ,आकाश पेठे, विकास साळुंखे ,रोहन ओव्हाळ ,मयुर ओव्हाळ ,बाळु ओव्हाळ ,भैय्या बल्लाळ,अमर ओव्हाळ,राम लोंढे , अनिकेत ब्रम्हराक्षस आदी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top