उस्मानाबाद / प्रतिनिधी- 
उस्मानाबाद नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष  मकरंदराजे निंबाळकर यांनी पत्नीच्या नावेवर प्रधानमंत्री मत्स संपदा योजने अंतर्गत अनुदान असलेल्या भूजलाशयीन पिंजरा मत्स्य संवर्धन प्रकल्पास दिलेल्या मान्यतेची चौकशी करुन फौजदारी गुन्हे दाखल करणेबाबत.   भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने निवेदन करण्यात येते की, नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांच्या पत्नी श्रीमती वैशाली मकरंद राजेनिंबाळकर यांना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सन 2021-22 अंतर्गत रामदरा ल.पा. तलाव ता. तुळजापुर जि. धाराशिव येथे भूजलाशयीन पिंजरा मत्स्य संवर्धन प्रकल्प स्थापित करण्यासाठी नियमबाहय पध्दतीने मान्यता देवुन कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे.
   निवेदन देते समयी  जिल्हा उपाध्यक्ष सुनील  काकडे, शहराध्यक्ष राहुल काकडे, माजी उपनगराध्यक्ष अभय इंगळे, मोहन मुंडे, संदीप इंगळे, सचिन तावडे, रोहित देशमुख, सुनील गवळी, सुजित साळुंके,पांडुरंग लाटे,गणेश मोरे, शेषराव उंबरे, अतुल चव्हान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top