उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 रस्त्यानी गाडी चालवताना नागरिकांनी सर्व वाहतुकीच्या नियमाचे पालन करणे गरजेचे असून आपण नियमाचे पालन केले तर होणारे अपघात आपण टाळू शकतो असे मत रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त आयोजित मोफत नेत्र, शुगर व रक्तदान शिबिराच्या प्रसंगी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी बोलत होते.

 जिल्हा वाहतूक शाखा, जिल्हा व्यापारी महासंघ, एकता फाउंडेशन व गणेश मंडळ, संस्कृती प्रतिष्ठान, सायली आय हॉस्पिटल, नायगांवकर क्लिनिकल लॅब व सह्याद्री ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेञ, शुगर व रक्तदान शिबीरांच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक उस्मान शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा अमित मस्के, कॅटचे सचिव लक्ष्मीकांत जाधव, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय मोदानी, डॉ. गोविंद कोकाटे, एकता फाउंडेशन व गणेश मंडळाचे अध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर व अमित कदम, संस्कृती प्रतिष्ठान अध्यक्ष राम मुंडे, रुपेश नायगावकर आदीची प्रमुख उपस्थिती होती.

 पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस मुख्यालयाच्या पाठीमागे लोकांसाठी पोलीस मैदान व्यायामासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून, विविध ठिकाणी वृक्षारोपण चे उपक्रम चालू असुन विविध संघटनांनी एकत्र येऊन या वृक्ष लागवड मोहिमेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन अतुल कुलकर्णी यांनी केले. वृक्षाला पाणी देऊन कार्यक्रमा ची सुरुवात करणे हे खुपच कौतुकास्पद असुन यांचे अनुकरण सर्वानी करावे व अन्य इतर समाजपयोगी उपक्रमाला पोलीस प्रशासनाच्या वतीने सहकार्य राहील अशी ग्याही अतुल कुलकर्णी यांनी दिली.

         रस्ता सुरक्षा सप्ताहच्या अनुषंगाने जिल्हामध्ये विविध उपक्रम राबविले असल्याचे सांगत नागरिकांनी नियमाचे पालन करुन जिल्हा वाहतूक पोलीस शाखेला सहकार्य करावे अशी अपेक्षा जिल्हा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित मस्के यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविक पर भाषणात एकता परिवाराचे सचिव अभिलाष लोमटे यांनी आजपर्यंत संस्थेने केलेल्या उपक्रमाची माहिती दिली व पोलीस प्रशासनाच्या वतीने विविध क्षेत्रात राबवत असलेल्या उपक्रमाला सहकार्य राहील अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाची सुरुवात वृक्षाला पाणी देऊन करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिलाष लोमटे व आभारप्रदर्शन लक्ष्मीकांत जाधव यांनी केले. यावेळी 73 जणांचे शुगर तपासणी, 54 जणांचे नेञ तपासणी व 18 जणांनी रक्तदान केले. यावेळी शहरातून रिक्षा रॅली पण काढण्यात आली होती.

          यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे धनंजय जेवळीकर, जितेंद्र खंडेरिया, नितीन फंड, संतोष कुलकर्णी, एकता परिवाराचे कार्याध्यक्ष विशाल थोरात, शिवलिंग गुळवे, अक्षय गांधी, सचिन बारस्कर, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष रमेश यादव, जमाल तांबोळी, चालक संघटनेचे अध्यक्ष बालाजी पवार, रिक्षाचालक व वाहतूक शाखेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 
Top