उस्मानाबाद / प्रतिनिधी

देशभरात वाढत चाललेल्या लव्ह जिहादच्या घटना आणि त्यामुळे होत असलेल्या धर्मांतराच्या घटनांवर जनजागृती करून यासंबंधी कठोर कायदा करावा आणि या कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने धाराशिव शहरात तीन जानेवारी रोजी मंगळवारी हिंदू आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

3 जानेवारीला मंगळवारी सकाळी दहा वाजता राजमाता जिजाऊ चौक बार्शी नाका या ठिकाणी सर्वप्रथम राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पूजन करून या मोर्चाला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर हा मोर्चा  जिजाऊ चौक - लेडीज क्लब- अंबाला हॉटेल -  जिल्हाधिकारी निवासस्थान - काळा मारुती -  माऊली चौक - नेहरू चौक - जिजामाता उद्यान - भारत टॉकीज - छत्रपती शिवाजी महाराज चौक - जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला जाणार आहे.

या मोर्चामध्ये शहरातील सर्व गणेश मंडळे , भजनी मंडळे , महिला मंडळ,तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थिनी , जागरूक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

या आक्रोश मोर्चा विषयी  माहिती देणारे प्रसिद्धी पत्रक नागरिकांपर्यंत पोहोचवले जात आहे. त्यात देशभर घडत असलेल्या लव जिहाद विषयीच्या विविध घटनांचा उल्लेख करून आपल्या घरा पर्यंत आलेल्या या संकटाची तीव्रता सांगितली जात आहे. लव जिहादच्या घटना रोखण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज या प्रसिद्धीपत्रकात  व्यक्त करण्यात आली  असून अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी समाजाची जागरूकता वाढवण्याचे काम या आक्रोश मोर्चातून केले जाणार आहे. सरकारने या विषयी कठोर कायदा करून त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारकडे केले जाणार आहे.

तरी या मोर्चात प्रत्येक जागरूक हिंदू नागरिकाने आबाल वृद्ध महिला पुरुष विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

 
Top