तुळजापूर / प्रतिनिधी-

श्रीतुळजाभवानी मातेच्या पौष महिन्यातील शाकंभरी नवराञोत्सवातील चौय्था माळेदिनी सोमवार दि२रोजी देविंजींच्या सिंहासनावर मुरली अलंकार महापुजा मांडण्यात आली. देविजींचे मुरली वाजवितानाचे रुप पाहुन भाविक धन्य धन्य होत होता. मंगळवार दि.३रोजी जलयाञा सोहळा संपन्न होणार आहे. 

 या जलयाञा सोहळ्याची तयारी  श्री तुळजाभवानी प्रक्षाळ चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे.   जलयात्रामार्ग पापनास तिर्थ  ते श्री तुळजाभवानी मंदिर,  शांकभरी मातेची शाक  प्रतिमा    भाजीपालाफळांचा हारसह  जलयात्रेसाठी पाच हजार कलश  कलश मिरवणुकीकरीता रथ  याची व्यवस्था केली आहे. सहभागी  सुहासिणी, कुमारीका व आराधीनी यांना 5000 कलश जलकुंभ वाटप करण्यात येणार आहेत.

दिंडया, पताका, गोंधळी, आराधी, वारुवाले, धनगरी ढोल यांना निमंत्रीत केले आहे. सवाद्य मिरवणुकी करीता पुणे येथील बँड व बँजो पथक व तुतारी यांची व्यवस्था केलेली आहे.  जलयात्रेमध्ये सहभाग घेणारे सर्व भाविक महिला, कुमारीका, आराधी, वरील सर्व पथक अशा  वीस हजार  भक्तांना  मिष्टांन भोजन व्यवस्था भवानी रोड व लगतची भाजी मंडई येथे केली आहे. प्रक्षाळ मंडळाचे कार्यकर्ते यांना ड्रेसकोड देण्याची व्यवस्था केलेली आहे. अद्यावत वाद्यासह. उत्सवातील शोभायात्रेमधील मुख्य प्रतिक "अश्व व गजराज " असणार  वरील प्रमाणे जलयात्रा उत्सव भव्य दिव्य प्रमाणात  साजरा करण्यासाठी तयारी केली  आहे.

 कार्यक्रमास होणारा सर्व खर्च श्री तुळजाभवानी प्रक्षाळ चॅरिटेबल ट्रस्ट, तुळजापूर यांच्याकडून करण्यात येणार आहे. जलयात्रा उत्सवामध्ये सेवेत सहभाग सेवा व जलयात्रेची शोभा वाढवावी,असे आवाहन श्री तुळजाभवानी प्रक्षाळ चॅरिटेबल ट्रस्ट, तुळजापूर यांनी केले आहे.

 
Top