उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्र क्रीडा व युवक संचालनालय  महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आणि महाराष्ट्र खो खो असोसिएशन यांच्या सहकार्याने जळगाव येथे दि.  द१० ते १२ जानेवारी दरम्यान झालेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत खो खो क्रीडा प्रकारात महिला गटात उस्मानाबाद महिला संघाने ठाणे संघाचा पराभव करत सुवर्णपदक पटकाविले जळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित खो-खो स्पर्धेत महिला गटात उस्मानाबाद ने ठाणे संघाचा एका गुनाने पराभव केला शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या सामन्यात उस्मानाबादच्या अश्विनी शिंदे ,संपदा मोरे, सुहानी धोत्रे, तन्वी भोसले यांनी चांगले खेळाचे प्रदर्शन करित विजयात मोलाची कामगिरी केली. विजयी महिला संघास प्रशिक्षक प्रवीण बागल यांचे मार्गदर्शन लाभले विजय संघातील सर्व महिला खेळाडू व श्रीपतराव भोसले हायस्कूलचे क्रिडाशिक्षक प्रशिक्षक प्रवीण बागल यांचे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  सुधीर पाटील भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव  आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस सौ प्रेमाताई पाटील प्रशासकीय अधिकारी आदित्य सुधीर पाटील यांनी हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


 
Top