उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये १४ जानेवारी भुगोल तज्ञ सी.डी. देशपांडे यांच्या जन्मदिन हा   राष्ट्रीय भूगोल  दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .

   या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेचे प्राचार्य देशमुख साहेब राव देशमुख उपप्राचार्य, संतोष घार्गे ,उपमुख्याध्यापक सिध्देश्वर कोळी यांनी पृथ्वी गोलाचे पूजन केले, यावेळी  पर्यवेक्षक के. वाय.इंगळे श्रीमती बी.बी.गुंड , टी.पी शेटे, आर.बी. जाधव, के. वाय.गायकवाड,डी.ए.देशमुख भूगोल विभाग प्रमुख एस. के.आघाव , भुगोल विषयाचे अध्यापक बी. व्ही.लोखंडे , एस.एस. सांळुके , ए.ए .जाधव राजेंद्र जोगदंड, भारत गवळी, विश्वास शेवाळे , प्रकाश गावित, एस.डी.माकणीकर तसेच  सौ .राऊत, डी. एल .कांबळे,पी. पी. मैत्रे विद्यार्थी उपस्थित होते .

   प्राचार्यांनी भूगोल दिनाचे औचित्य साधून विद्यार्थांनी पर्यावरणाचा समतोल साधून  पृथ्वीचे रक्षण करावे ,  असा मोलाचा सल्ला दिला . त्याच बरोबर एस.के. आघाव व बी .टी. गवळी यांनी राष्ट्रीय भुगोल दिनाचे महत्व सांगितले. इयत्ता ७वीच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण बचाव , पाणी हे जीवन या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कलाध्यापक शेषनाथ वाघ यांनी केले तर आभार श्रीमती पी.पी. मैत्रे यांनी मानले.

 
Top