उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली, यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले, उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ मणेर म्हणाले की,शिक्षणाच्या अग्रगण्य प्रणेत्या जेंव्हा सामाजिक भूमिवर कार्यरत होत्या त्यावेळी समाजाची मानसिकता स्त्री शिक्षणासाठी पूर्णपणे नकारात्मक होती,कारण त्यावेळी मुळात स्त्रीयांनी शिक्षीत व्हावे ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती,अशा सामाजिक विषमतेच्या परिस्थिती मध्ये स्त्री शिक्षणासाच्या उध्दारकर्त्या म्हणुन अतोनात अवमान सहन करत शिक्षणाची देवी व भारतातील प्रथम शिक्षिका सावित्रीबाई फुले समाजासाठी समोर येतात.पण अशा प्रतिकुल परिस्थिती मध्ये सुद्धा त्यांचा बाणेदारपणा कमी झाला नाही, भिडे वाड्यातील मुलिंची पहिली शाळा ही घटनाच मुळी त्यांच्या धाडसीपणाचा परिचय देते.१८९७ मध्ये पुणे येथे प्लेगची साथ आली, यावेळी लोक एकमेकांना भेटण्यास धजत नव्हते कारण ज्यांना हा रोग व्हायचा त्यांचा मृत्यू निश्चीत होता, अशावेळी स्वत:ती परवा न करता त्या समाज सेवेसाठी बाहेर पडल्या.समाजातील अंधश्रद्धा निर्मुलन, बालविवाह या अनिष्ठ प्रथेला प्रकर्षाने विरोध केला, तरुण तरुणींनी त्यांचे आत्मचरित्र अभ्यासण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा आशपाक आतार यांनी तर आभार डॉ मंत्री आडे यांनी मानले यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 
Top