उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्हा पोलीस दल आणि एस.एन. डी. टी महिला विद्यापीठ(समाजकार्य विभाग) मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने उस्मानाबाद येथे महिला आणि बाल सुरक्षा अभियानांतर्गत कार्यशाळा घेण्यात आली.

 तसेच जिल्ह्यातील पारधी पिढीमध्ये सर्वे करण्यात आला. महिला आणि बाल सुरक्षा अभियानांतर्गत सहभागी झालेल्या एस.एन. डी. टी. महिला विद्यापीठाच्या स्वयंसेविकांनी एक महिना सहभाग घेऊन नळदुर्ग, लोहारा, खानापुर, उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे, उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाणे यांसह जिल्हा शासकिय न्यायालय येथील कामकाजाची माहिती घेतली. तर सर्व स्वयंसेवकांना जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.


 
Top