उस्मानाबाद / प्रतिनिधी-

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) पुणे आणि जिल्हा पोलीस दल उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व अधिकारी, अंमलदारासाठी माहिती अधिकार कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन आज रोजी करण्यात आले होते.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी  यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत‍ शिवाजीराव पवार,नितीन राऊत यांनी कायद्याची माहिती,कायद्यातील कलमे,जिल्हा न्यायालय,उच्च न्यायालय,सर्वोच्च न्यायालयांतील खटल्याचे संदर्भ याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.कार्यशाळेत पोलीस अधिकारी,अंमलदारांनी विचारलेल्या शंकेचे  पवार व  राऊत यांनी निरासन करुन आवश्यक ते मार्गदर्शन केले. 

कायदेविषयक माहिती अवगत असल्यास पोलीस आणि नागरिकांना कायदेविषक ज्ञान मिळुन प्रशासनात गतिमानता येते या उद्देशाने या कार्याशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत जिल्हयातील सर्व पोलीस उपअधिक्षक, पेालीस निरीक्षक अंमलदार मोठया संख्येने उपस्थित होते.


 
Top