तेर/ प्रतिनिधी-

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे कै.डाॅ.चंद्रकलादेवी पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शंभर मिटर धावणे स्पर्धेत अमन शेख प्रथम विजेता ठरला.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे कै.डाॅ.चंद्रकलादेवी  पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शंभर मिटर धावणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत अमन शेख प्रथम, प्रथमेश यादव व्दितीय, प्रेम कोळगे तृतीय विजेते ठरले.या स्पर्धेचे उद्घाटन एस.एस.बळवंतराव यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी तेरणा विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.डी.गायकवाड होते.तर प्रा.डी.बी.फंड,एस.यू गोडगे,एम.एन.भंडारे,एम.एन.शितोळे,एस.डी.घाडगे,डी.डी.पालकर,एल.टी.चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे आयोजन नरहरी बडवे यांनी केले होते.परीक्षक म्हणून अजिंक्य वराळे, योगेश माने यांनी काम पाहिले.

 
Top