तुळजापूर / प्रतिनिधी-

 तालुक्यातील  सावरगाव  येथील श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर अतिशय पुरातन असून  मंदिराचा हजारो वर्षाचा इतिहास आहे. श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर हे सावरगावचे वैभव असून मंदिरामुळे आपल्या गावचे नाव हे महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या नकाशावर कोरले गेले आहे. आगामी काळात सामाजिक बांधिलकी जोपासत  पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टच्या संकल्पनेतून गावात धर्मार्थ हॉस्पिटल सुरू करणार आहोत, अशी घोषणा  पद्मकुमार मेहता यांनी केली. 

 सावरगाव येथील येथील नवनिर्वाचीत सरपंच उपसरपंच, सदस्यांचा सत्कार  श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट  तर्फे करण्यात आला.  यावेळी ते बोलत होते  .  यावेळी  राजकुमार पाटील, रामेश्वर तोडकरी, सुवर्णाताई पाटील,   स्वातीताई तोडकरी,  सुषमाताई होटकर, ज्योतीताई काडगावकर, कीर्तीताई ताटे,  हनुमंत माळी, पांडुरंग हागरे , धर्मराज शिंदे ,अमोल माने, परमेश्वर तानवडे ,रोहित पाटील ,शाहू माळी, संदेश मगर, अतुल पवार ,अशोक करंडे  ,तायप्पा ताटे ,प्रा. कानिफनाथ माळी,  दादासाहेब काडगावकर ,दादासाहेब माळी , पद्मकुमार मेहता, भामंडळ मेहता,  प्रदीप मेहता ,वैभव मेहता,  डॉ.अनंद मेहता,  डॉ. आदर्श मेहता ,महावीर शहा, प्रशांत मेहता, अशोक मेहता, अक्षय मेहता ,प्रवीण दूरकर, भीमराव श्रीनामे, पद्मराज गडदे, विलास रोकडे ,नवनाथ माळी यांच्या सह ट्रस्टचे पदाधिकारी ,महिला भगिनी, ग्रामस्थ,   जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. संचालन पद्मकुमार मेहता यांनी केले. आभार प्रदर्शन डॉक्टर आदर्श मेहता यांनी केले.

 
Top