उस्मानाबाद / प्रतिनिधी-

अटल भूजल योजनेअंतर्गत एकदिवसीय तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, समाज कल्याण विभाग, उस्मानाबाद या ठिकाणी दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी पार पडला.

या प्रशिक्षण कार्यक्रचे उद्घाटन श्री.बी. एस. मेश्राम उपसंचालक,  औरंगाबाद विभाग औरंगाबाद यांनी केलं तर प्रमुख पाहुणे श्री. विलास जाधव अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद व श्री डॉ. योगेश खरमाटे उपविभागीय अधिकारी, महसूल, तथा अध्यक्ष तालुका समन्वय समिती अटल भूजल योजना यांच्यासह श्री.एस. बी. गायकवाड वरिष्ठ भूवैज्ञानिक, डॉ. मेघा शिंदे सहा.भुवैज्ञानिक भु.स.वि.यं. उस्मानाबाद यांच्या हस्ते कलश पूजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना मा. श्री. विलास जाधव अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीबाबत व भूजलाच्या उपलब्ध साठा यावर बोलताना जिल्ह्यातील 55 गावांची भूजल पातळी सातत्याने मोजून पाण्याचा उपसा मर्यादित व्हावा, कमी पाण्याची पिके लागवडीखाली आणावी आणि भूजल मित्रांच्या सहकार्याने पाण्याच्या स्त्रोतांची माहिती प्रचार प्रसिद्धी द्वारे सर्वांना पोहोचवावी, जलसुरक्षा आराखड्यामध्ये प्रस्तावित कामे सक्षमपणे राबविण्यात यावी असे सांगण्यात आले.

"जलसुरक्षा आराखडा अंमलबजावणी", तालुकास्तरीय प्रशिक्षणात योजनेची सर्वसाधारण माहिती, अमलबजावणी प्रक्रिया, आराखड्याची रचना, प्रमुख घटक व उपायोजना विविध संलग्न विभागातील योजनांचे सादरीकरण तसेच ग्रामस्तरावर भूजल पातळी पर्जन्यमान मोजमाप उपकरणे, पिझोमीटर, भूजल माहिती संकलन केंद्र व विविध स्तरातील सामाजिक उपक्रम तसेच उपाययोजना याबाबत श्री.जीवन काकडे उपविभागीय मृद व जलसंधारण अधिकारी, श्री.एस.बी.गायकवाड वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री.डी. आर. जाधव तालुका कृषी अधिकारी उस्मानाबाद, आदर्श सरपंच श्री. सुनील गरड ग्रामपंचायत खेड, भूजल मित्र श्री.प्रशांत माने, श्रीमती.अंजुम शेख श्री. DIP चे समन्वयक श्री.डी.सी. राठोड सर, समाजसेवक श्री. विश्वनाथ खोत, श्रीमती शोभा कुलकर्णी माविम यांनी आपल्या मार्गदर्शनातून भूजल व पाणी बचतीच्या उपायोजना याबाबतची माहिती दिली. या प्रशिक्षणाचे सूत्रसंचालन डॉ. मेघा शिंदे सहा. भूवैज्ञानिक यांनी केले तर आभार श्री ब्रह्मदेव माने समाज विकास तज्ञ यांनी मानले. या प्रशिक्षणाकरिता जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्ष व जिल्हा अंमलबजावणी भागीदार संस्थेतील तज्ञ समुदाय संघटक यांनी या प्रशिक्षणाची तयारी केली.


 
Top