तुळजापूर / प्रतिनिधी-

 मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत  माळुंब्रा ते अपसिंगा पंधरा   किलोमीटरचा रस्ता  दुरुस्ती काम नुकतेच करण्यात आले असुन हे काम थातुर मातुर केल्याने पुनश्च हा मार्ग धोकादायक बनला आहे.  मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कामे निकृष्ट दर्जाचे होत असल्याने या  योजने बरोबरच मुखमंञ्याचे ही नाव बदनाम होत आहे. तरी या कामाची गुणवत्ता तपासुन चौकशी अंती दोषीवर कारवाई करण्याची ग्रामस्थामधुन होत आहे.


 
Top