तुळजापूर / प्रतिनिधी-

परमपूज्य श्री श्री रविशंकर गुरुजी यांचा दि. 2 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी सहा वाजता "जागर भक्तीचा" हा भव्य कार्यक्रम परमपूज्य रविशंकर गुरुजींच्या सानिध्यात होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हा  कार्यक्रम  शक्तीनिशी यशस्वी  करण्याचा संकल्प   मंगळवार दि.१८रोजी झालेल्या शहर वासियांच्या बैठकीत करण्यात आला.

शहरातील  प्रतिष्ठित व सर्व राजकीय पक्ष पदाधिकारी , लोकप्रतिनिधी ,सामाजिक कार्यकर्ते , व्यापारी बंधू यांच्यात या कार्यक्रम बाबतीत  सविस्तर चर्चा होऊन चर्चेनंतर सर्वांनी  सर्व शक्तीनिशी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकल्प केला. जागर  भक्तीचा होणारा  कार्यक्रम म्हणजे  एक भाग्याचा क्षण आहे.  तरी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  शहरवासीयांनी सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन देखिल या बैठकीत करण्यातत आले.   यावेळी शहरातील सर्व राजकिय पक्षाचे पदाधिकारी व्यापारी प्रतिष्ठीत नागरिक मोठ्या संखेने उपस्थितीत होते.


 
Top