उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मकर संक्राती सणाचे औचित्य साधून लेडीज क्लबच्या अध्यक्षा तथा जि.प.च्या माजी उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या वतीने वाघोली ता.धाराशिव येथे हळदी -कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते. या कार्यक्रमास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देवून मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.  याप्रसंगी सौ.अर्चनाताई पाटील यांनी महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडी अडचणी जाणून घेतल्या. तसेच महिलांच्या काही वैयक्तिक समस्या असल्या तर त्या हि   सांगाव्यात त्या सोडवण्यासाठी आपला प्रयत्न राहील असे हि सांगितले. बचत गटातील महिलांनी केंद्र व राज्य शासनाच्या नवीन उद्योग व व्यवसाय उभारणीसाठीच्या असलेल्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. गावाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न आहे. या कार्यक्रमास आलेल्या महिलांना नवीन वर्षाची दिनदर्शिका भेट म्हणुन  देण्यात आली.  

 या कार्यक्रमास जि.प.च्या माजी अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा नंदाताई पुनगुडे, मनीषाताई केंद्रे, माधुरीताई गरड,  माजी सरपंच सौ.कांचनताई मगर, सौ.कल्पनाताई खडके, माजी पंचायत समिती सभापती श्री.ओमप्रकाश मगर, माजी पंचायत समिती उपसभापती श्री.प्रदीप शिंदे, माजी उपसरपंच श्री.सतीश खडके, श्री.दिलीप पाटील, श्री.उमेश मगर, श्री.बाळासाहेब पिंपळे, श्री.सुधीर मगर, श्री.स्वप्नील मते, श्री.पांडुरंग सुतार, श्री.श्रीमंत मगर, श्री.श्रीकृष्ण पवार यांच्यासह महिला भगिनींत  यांच्यासह बचत गटातील महिला, आशा कार्यकर्ती व अंगणवाडी सेविका, गावातील प्रमुख कार्यकर्ते व महिला भगिनी उपस्थित होत्या. 


 
Top