उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद जिल्ह्यातील युवक-युवतींना प्रमोद महाजन कौशल्य व उदयोजकता विकास अभियानांतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम 2022-23 अंतर्गत जिल्ह्यात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बँकीग ॲन्ड फायनन्स, टेलिकॉम, लॉजिस्टीक, अॅप्रेल, रिटेल, इलेक्ट्रॉनिक्स, फुड प्रोसेसिंग, मिडीया अॅन्ड एन्टरटेनमेंट, हॉस्पीटॅलिटी या सेक्टरमधील कोर्सचे मोफत कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी वयाची अट 18 ते 45 राहील आणि उमेदवार उस्मानाबाद जिल्हयातील रहिवासी असावा. तसेच यापुर्वी कौशल्य विकास प्रशिक्षण घेतलेला नसावा.

 जिल्ह्यातील 18 ते 45 वयोगटातील इच्छुक आणि पात्रताधारक कौशल्य प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी https://forms.gle/qXmCBNyZtL8kYbBC9  या गुगल फॉर्म लिंकच्या माध्यमातून आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा समन्वयक दत्तात्रय कांबळे मो- 9028238465 किंवा 02472-299434 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय गुरव यांनी केले आहे.

 
Top