तुळजापूर/प्रतिनिधी - 

श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयातील  विद्यार्थ्यांनी एन. डी. ए. परीक्षेमध्ये पाञ होवुन सैनादलात   अधिकारी पदावर नियुक्त होण्यासाठी प्रयत्न करावेत ,असे प्रतिपादन   जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे  यांनी श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयास भेट देऊन  िद्यार्थ्याशी संवाद साधताना केले.

 जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे  यांनी. श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयास भेट देऊन   विद्यालयाची वाटचाल समजून घेत उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले.   यावेळी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. विद्यालयात आगमन होताच बालसैनिकांनी संचलन करुन माननीय जिल्हाधिकारी यांना मानवंदना दिली व काही विद्यार्थ्यांनी विविध अडथळे पार करुन शारीरिक कसरतीचे प्रात्यक्षिक करुन दाखवले. शाळेच्या स्थापनेपासूनचा शाळेच्या वाटचालीचा प्रवास आपल्या प्रास्ताविकातून विद्यालयाचे प्राचार्य श्री व्ही. बी. घोडके यांनी मांडला. त्यानंतर मा. जिल्हाधिकारी यांनी विद्यालयातील 50 टक्के पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी एन. डी. ए. परीक्षेमध्ये पात्र व्हावे. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सैन्य दलामध्ये अधिकारी पदावर नियुक्त होण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. यासाठी सातारा सैनिकी शाळा व सैनिकी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे असे सूचित केले. त्यासाठी विद्यालयात दोन डिजीटल क्लासरूम उपलब्ध कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर सी. एस. आर. फंडातून 40 संगणक प्राप्तीसाठी प्रस्ताव सादर करण्यास सांगीतले.

विद्यालयास पंचवीस  वर्ष पूर्ण झाल्याने रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करण्यात यावे असे सूचित केले. विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याशी संवाद साधून कर्मचा-यांच्या समस्या जाणून घेतल्या.या प्रसंगी तुळजापूरचे मा. तहसीलदार तथा विश्वस्त मा. सौदागर तांदळे साहेब, मा. तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) मा. श्रीमती योगिता कोल्हे व श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे मा. लेखाधिकारी   एस. एम. शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री पांचाळ डी. एस. यांनी केले तर श्री स्वामी आर. एस. यांनी आभार मानले.


 
Top