उस्मानाबाद / प्रतिनिधी-

   फिल्ड मार्शल करिप्पा आणि जनरल थिमय्या यांच्या पुढाकारातून अस्तित्वात आलेली भारतीय माजी सैनिक संघटना ही शिर्ष संघटना असून नुकतेच या संघटनेच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी अरुण तळीखेडे यांची निवड झाली आहे. भारतीय माजी सैनिक संघटना दिल्लीचे अध्यक्ष ब्रिगेडियर करतार सिंग यांनी तळीखेडे यांना निवडून आल्याचे पत्र दिले आहे.

   श्री अरुण तळेकर हे मूळ उमरगा येथील उस्मानाबाद जिल्ह्याचे सुपुत्र असून मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सव समितीचे सदस्य आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सव समिती जिल्हा धाराशिव च्यावतीने संयोजक युवराज बप्पा नळे, समितीचे मार्गदर्शक बुबासाहेब जाधव, ॲड.महेंद्र देशमुख, सुरेश शेळके, प्रा. अभिमान हंगरकर, प्रताप देशमुख, मदन पवार, प्रविण जगताप, गुलचंद व्यवहारे, ॲड कुलदिपसिंह भोसले, रविंद्र शिंदे, हंगरगेकर, राजेश परदेशी, मुरलीधर होनाळकर, मोहन मुंडे, राजाभाऊ कारंडे, यांच्या सह सर्व समिती सदस्यांनी अभिनंदन केले आहे.


 
Top