उस्मानाबाद / प्रतिनिधी-

लेडीज क्लबच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या वतीने मंगरूळ ता.तुळजापूर येथील आयोजित केलेल्या या कार्यक्रमास महिलांनी उस्फूर्त प्रतिसाद दर्शवला. यावेळी सौ.अर्चनाताई पाटील यांनी माता-भगिनींशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. चर्चे दरम्यान महिला व कार्यकर्त्यांनी गावातील वाचनालयासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच स्मशान भूमीचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली. खंडोबा मंदिर समोर सभामंडप आणि गावांतर्गत रस्ते करण्यात यावेत अशी मागणी केली. यातील काही कामांना निधी उपलब्ध केलेला असून उर्वरित कामांना देखील निधी उपलब्ध करण्यात येईल असे सौ.अर्चनाताई पाटील यांनी आश्वासित केले. तसेच मंगरूळ व परिसराच्या विकासासाठी अधिकाधिक निधी देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

 बचत गटातील महिलांशी देखील सौ.अर्चनाताई पाटील यांनी चर्चा केली. बचत गटातील महिलांनी नवीन उद्योग व्यवसाय उभारणीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यासाठी महिलां पुढे आल्यास त्यांना राष्ट्रीयकृत बँकांमार्फत कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित महिलांना वाण भेट देण्यात आले. 

 याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा श्रीमती अस्मिताताई कांबळे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील मॅडम, सौ. स्वातीताई सरडे, सौ.माधुरीताई सरडे, सौ.सोनालीताई सरडे, सौ. अश्विनीताई लबडे, सौ.भाग्यश्रीताई खोपडे, सौ.स्वातीताई साठे, सौ.माधुरीताई कोरेकर, सौ.स्वातीताई शिंदे, सौ.आशाताई सरडे, सौ.पूजाताई सरडे, सौ.अश्विनीताई सरडे, सौ.गंगाबाई हजारे यांच्यासह गावातील प्रमुख कार्यकर्ते मा.पं.स.सदस्य श्री.चित्तरंजन सरडे, मा.सरपंच सत्तार मुलाणी, श्री.धनंजय लबडे, श्री.आबासाहेब  सरडे, श्री. प्रशांत खोपडे, श्री.राहुल साठे, श्री.सयाजी शिंदे, श्री.प्रमोद क्षीरसागर, श्री.तानाजी सरडे, श्री.प्रकाश सरडे, श्री.राहुल सरडे, श्री.बंडू सरडे आदींसह बचत गटातील महिला सदस्य, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका व  महिला भगिनी उपस्थित होते.


 
Top