लोहारा/प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले जयंती उत्सव समिती व महात्मा फुले युवा मंच यांच्यावतीने लोहारा शहरातील शिवनगर येथे क्रांतीज्योती स्त्रि शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम घेऊन अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका तथा भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्षा आरती सतिश गिरी होत्या. तर प्रतिमेचे पुजन नगरसेविका सुमन रोडगे यांच्या हस्ते करण्यात आले.तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार, नगरसेविका शामलताई बळीराम माळी,माजी जि.प. सदस्या मिराताई अविनाश माळी,सोसायटी संचालिका सुंनदा क्षीरसागर,आदि उपस्थित होत्या.

यावेळी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी करजखेडा ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत सदस्यपदी फुलचंद बनकर विजयी झाल्याबद्दल यांचा यथोचित सत्कार करुन सन्मान करण्यात आला.यावेळी नगरसेवक तथा जिल्हा बोर्ड संचालक अविनाश माळी,ठाकरे गट युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार,नगरसेवक जालिंदर कोकणे,रोहयोचे माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे,मा.नगरसेवक श्रीनिवास माळी, सोसायटीचे व्हाईस चेअरमन राम क्षीरसागर, प्रकाश भगत,पत्रकार निळकंठ कांबळे,पत्रकार संघ तालुकाध्यक्ष तथा भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला,अशोक माळी,सुग्रीव क्षीरसागर,अमोल माळी,गौरव गोसावी,सकलेन शेख,सोमनाथ भोजने,शरण माळी,राजेंद्र माळी,रघुनाथ फुलसुंदर,अशोक क्षीरसागर,ज्ञानेश्वर माळी, संतोष माळी,अशोक काटे, संजय दरेकर,नवनाथ माळी, शंकर माळी,महादेवी माळी, मंगल क्षीरसागर,भाग्यक्षी काटे, गितांजली क्षीरसागर,सुजाता क्षीरसागर,सुनंदा क्षीरसागर, वैष्णवी क्षीरसागर,अनिता साखरे,गुलाब फुलसुंदर, काशीबाई क्षीरसागर,वंदना गायकवाड,आर्या फुलसुंदर, सई क्षीरसागर,सार्थकी क्षीरसागर,सुहानी ताटे,बंटी माळी, लक्ष्मण क्षीरसागर, नारायण क्षीरसागर,दिनेश माळी,सचिन माळी,विष्णु माळी,श्रीकांत माळी,महेश माळी,निखिल माळी,यांच्या सह नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अशोक क्षीरसागर यांनी केले.तर आभार माजी नगरसेवक श्रीनिवास माळी यांनी मानले.


 
Top