तुळजापूर/ प्रतिनिधी-
श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवातील पाचव्या दिवशी मंगळवार दि.३रोजी जलयात्रा मिरवणुकीचा पारंपरिक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
मंगळवार (३ जाने.) सकाळी ७ वाजता तुळजापुरातील पापनाश तिर्थकुंड येथे इंद्रायनी देवि व जलकुंभाचे पुजन महंत तुकोजीबुव, महंत हमरोजीबुवा यांच्या प्रमुख उपस्थितीत यजमान श्री व सौ. श्रीराम कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाले. नंतर जलकुंभ यजमान यांच्या खांद्यावर देण्यात आला. आंबा पाने व श्रीफळ व जल,असलेल्या जलकुंभ सुवासनी, कुमारीका यांनी घेवुन त्या मिरवणूक सोहळ्यात सहभागी झाल्या.
सजविलेल्या रथातून देवीच्या प्रतिमेची संबळाच्या कडकडाटात व आई राजा उदोऽ उदोऽऽ च्या उद्घोषात भव्य-दिव्य छञपती शिवाजी महाराज पुतळा , भवानी रोड, मंदीर महाद्वार येथुन ही मिरवणूक सकाळी ११ वा. मंदिरात पोहचली . यात प्रथम चांदीचा जलाने देविमंदीर गर्भगृहासह स्वच्छ करण्यास आरंभ झाला .यात सुवासनी, कुमारीका यांनी डोक्यावर आणलेल्या जलकूंभातील पविञ जलाने मंदीर स्वच्छ करण्यात आले. सहभागी कुमारीका , सुवासनी यांची खणनारळाने ओटी भरुन त्यांचा सन्मान करण्यात आला .
जलकुंभाच्या मिरवणूक सोहळ्याने तुळजापूर नगरीतील मंदिराकडे येणारे रस्ते भाविकांच्या गर्दीने गजबजून गेले होते. जलयाञेचा सोहळा संपल्यानंतर देवविजींच्या अभिषेक पुजेची घाट करण्यात येवुन सिंहासन अभिषेक पुजा करण्यात आल्यानंतर देविजीस वस्ञोलंकार घालण्यात आले. नंतर देविंजींचा सिंहासनावर शेषशाही अलंकार महापुजा मांडण्यात आली.राञी मंदीर प्रांगणात छबिना काढण्यात आल्यानंतर महंत तुकोजी बुवा यांनी प्रक्षाळपुजा केल्यानंतर शाकंभरी नवराञोत्सवातील पाचव्या माळेच्या धार्मिक विधीची सांगता झाली. श्री तुळजाभवानी प्रक्षाळ चॅरिटेबल ट्रस्ट, तुळजापूरच्या हजारो सदस्यांनी जलयाञा सोहळा भव्यदिव्य साजरा करण्यासाठी परिश्रम घेतले.
महाप्रसाद वाटप
देविचे महंत तुकोजीबुवा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री तुळजाभवानी प्रक्षाळ चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने यंदा जलयाञेत सहभागी झालेल्या सुवासनी, कुमारीका, आराधी वाघे मुरळी , पारंपरिक कलावंत, भाविक अशा वीस हजार लोकांना अन्नदान महाप्रसाद वाटप करण्यात आला.
जलयाञा सोहळ्यात जिल्हाधिकारी सपत्नीक सहभागी !
श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवराञोत्सवातील जलयाञा सोहळ्यात जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष डाँ सचिन ओंबासे सपत्नीक सहभागी झाले होते तसेच महंत तुकोजीबुवा, महंत चिलोजीबुवा , महंत वाकोजीबुवा, महंत हमरोजीबुवा, माजी जिप उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील, प्रशासकीय अधिकारी तथा तहसिलदार योगिता कोल्हे, पो.नि अदिनाथ काशीद, धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक विश्वास कदम, जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे, लेखापाल सिध्देश्वर इंतुलेसह मंदीर अधिकारी, कर्मचारी सह अन्य राज्यतील भाविक यात सहभागी झाले होते.