तुळजापूर / प्रतिनिधी-

 तालुक्यातील काक्रंबा येथील शुक्रवार दि.२७ रोजी होणारी  पहिलीच ग्रामसभा  कोरम अभावी  गुंडाळावी लागल्याने उपस्थित ग्रामस्थांनी  नाराजी व्यक्त करत होते.

  सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी साडेदहा वाजता ग्रामसभेला सुरुवात करण्यात आली. मात्र ग्रामस्थांची संख्या अगदीच नगण्य होती. ग्रामसेवक वारंवार सदस्यांना विनंती करत होते की ग्रामस्थांना  बोलवा ग्रामस्थ   फिरकले नाहीत.  या सभेस  साडेचार हजार आसपास लोकसंख्या असलेल्या एवढ्या मोठ्या गावातून अत्यल्प  ग्रामस्थ  ग्रामसभेला उपस्थित राहिल्याने ग्रामसभा गुंडाळावी लागली.  मात्र उपस्थित नागरिक आठ दिवसातून दोन ग्रामसभा घेता का म्हणत सत्ताधाऱ्यावर आरोप करत निघून गेले.

यावेळी सरपंच कालिदास खताळ, ग्रा.पं. सदस्य पवन वाघमारे, सुजित घोगरे, सोमनाथ घोगरे, विकास भिसे, नागनाथ खताळ, ग्रामसेवक केवलराम, पोलीस पाटील प्रमोद खताळ, समाधान देवगुंडे, राम घोगरे, उमेश पांडगळे बाळासाहेब मस्के, अहमद आन्सारी,गणपत पाटील, लक्ष्मण धोंगडे ग्रामपंचायत कर्मचारी शिवाजी सुरवसे, शशिकांत पांडगळे, रोजगार सेवक विनोद साबळे,ऑपरेटर समाधान पाटील उपस्थित होते


 
Top