तुळजापूर/ प्रतिनिधी-

 तुळजापूर  विधीज्ञ संघाच्या अध्यक्ष‎ पदासाठी शुक्रवार दि.१३रोजी  प्रथमच निवडणुक होवुन यात अध्यक्षपदी अँड.संजय पवार, सचिव पदी अँड. जगजीवन तांबे हे विजयी झाले.    तुळजापूर विधीज्ञ संघाची निवडणुक बिनविरोध करण्याची परंपरा होती. पण   पदाधिकारी निवडीवर  एकमत न झाल्याने‎ निवडणुक जाहीर करण्यात आली‎ होती. 

 १३ जानेवारी रोजी मतदान व दुपारी‎ मतमोजणी झाली. यात १४६ पैकी १४४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला .या अत्यंत अटितटीच्या झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी अँड संजय पवार, उपाध्यक्ष पदी अँड. बालाजी देशमाने, सचिव पदी अँड जगजीवन तांबे, सहसचिव पदी  अँड. सुनिल लोंढे, कोषाध्यक्ष पदी अँड. फारुख शेख बिनविरोध निवडुन आले होते. महिला प्रतिनिधी म्हणून अँड. प्रतिक्षा अपराध पाटील या निवडुन आल्या . यावेळी निवडणूक निर्णय‎ अधिकारी म्हणून अॅड. तानाजी‎ तांबे, अॅड. तानाजी जगताप, अॅड.‎ किरण कुलकर्णी, अॅड. संगिता‎ कोळेकर, अॅड. क्रांती थिटे यांनी काम पाहिले.


 
Top