उस्मानाबाद / प्रतिनिधी -

वंदनीय हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख,स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे  जयंती खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास दादा पाटील ,संपर्कप्रमुख शंकर तात्या बोरकर,माजी नगराध्यक्ष नंदू भैया राजे निंबाळकर , शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ता बंडगर यांचे मार्गदर्शनाखाली शिवसेना युवा सेना संपर्क कार्यालय देशपांडे येथे विविध समाज उपयोगी उपक्रम घेऊन साजरी करण्यात आली.

जयंतीनिमित्त दिनांक 23 जानेवारी रोजी मुरारबाजी देशपांडे चौकात सकाळी अकरा वाजता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेनेच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करून बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर दुपारी बारा वाजता तुळजापूर नाका येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर तसेच बालाजी नगर शेकापूर येथील मारुती मंदिर परिसर व स्वामी समर्थ मंदिर परिसर या तिन्ही ठिकाणी फुल झाडांचे व बदामाच्या झाडांचे रोपण करण्यात आले.दिनांक 24 जानेवारी रोजी धाराशिव येथील कुष्ठधाम मधील रुग्णांना ब्लॅंकेट, अंगाची साबण, कपड्याचे साबण, खोबरेल तेल,चहापत्ती, साखर,फळे व अल्पोपहार रुग्णांच्या मागणीनुसार वाटप करण्यात आले.दिनांक 25 जानेवारी 202 रोजी धाराशिव येथील बेघर निवारा केंद्रात त्यांच्या मागणीनुसार 12 चादर वाटप करून मिठाई व अल्पोपहार आहाराची व्यवस्था करण्यात आली.

या कार्यक्रम प्रसंगी माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख भारत नाना इंगळे, जिल्हा परिषद सदस्य नितीन बाप्पा शेरखाने, तालुकाप्रमुख सतीशजी सोमानी, आतिशभैया पाटील, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, युवासेना जिल्हाप्रमुख तथा विभागीय सचिव अक्षय ढोबळे, युवासेना शहर प्रमुख तथा नगरसेवक रवी वाघमारे,  युवा सेना शहरउपप्रमुख मनोज उंबरे, नगरपरिषदचे गटनेते सोमनाथ आप्पा गुरव, नगरसेवक बाळासाहेब काकडे, नगरसेवक गणेश बाप्पा खोचरे, नगरसेवक राणा बनसोडे, दीपकजी जाधव, पंकज भैया पाटील ,अभिजीत देशमुख, सुनील गायकवाड, शिवसेना शहर उपप्रमुख बंडू आदरकर, गफूरभाई शेख,राम साळुंखे, संकेत सूर्यवंशी, हनुमंत देवकते, महेश लिमये, कालिदास शेरकर ,भैरव शेरकर,सद्दाम शेख,  सुनील मुंडे, गणेश साळुंखे, विभाग प्रमुख अजित वाकले, शिवसेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख राज जाधव,गुरुनाथ गवळी,किशोर साळुंखे ,किशोर लगदिवे ,लक्ष्मण जाधव उपस्थित होते.

  जयंती उत्सवाच्या यशस्वीतेसाठी दिनेश बंडगर, महेश देवकते, सुधीर अलकुंटे, सतीश लोंढे, अमित उंबरे, रवी वडणे, शकील गुड्डू जेके, बालाजी कांबळे, विजय दाडे, अजय दाडे, विजय आव्हाड, रामप्रसाद पवार, आप्पा भोसले,दत्ता गरड, सुलतान शेख, बबलू राऊत, परमेश्वर खताळ,  अजय विंचुरे, बाबू कांबळे या सर्वांनी परिश्रम घेतले.

 
Top